उस्मानाबादमध्ये औरंगजेबाविषयीच्या पोस्टवरून दोन गटात तुफान राडा; दगडफेकीत ४ पोलीस गंभीर जखमी

उस्मानाबाद  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या औरंगजेबाविषयीच्या पोस्टवरून  उस्मानाबादमध्ये दोन गटात तुफान राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी दोन गटामध्ये तुफान दगडफेक झाली असल्याचे म्हटले जात असून या दगड फेकीत ४ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

मंगळवारी रात्री १० च्या सुमारास शहरातील विजय चौक येथे ही घटना घडली. या दगडफेकीत विजय चौक येथे पोलीस बंदोबस्तासाठी असलेले ४ पोलीस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अंजुम शेख, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, शहर पोलीस निरिक्षक सुरेश बुधवंत , तहसिलदार गणेश माळी यांनी तातडीने कारवाई केली.

प्रशासनाने बंदोबस्त लावत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलीस प्रशासन दोन्ही गटातील कायदा हातात घेणाऱ्यांवर कार्यवाही करत आहे. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.