मुंबई पोलिसांकडून ‘सेक्स टुरिझम’चा पर्दाफाश; सापळा रचत दोन महिलांना अटक; दोघींची सुटका

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने मोठी कारवाई करत ‘सेक्स टुरिझम’चा पर्दाफाश केला आहे. यावेळी दोन महिलांना सापळा रचून  अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या प्रकरणातील  दोन तरुणींचा सुटका देखील पोलिसांनी केली असल्याची माहिती समोर येत आहे.

एक महिला आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून ‘सेक्स टुरिझम’ चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला होता. संबंधित आरोपी महिलेला याआधीही २००२ मध्ये अनैतिक वाहतूक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. पोलिसांनी ग्राहक असल्याचा बनाव करत सापळा रचला होता. यानंतर आरोपीने गोव्याची ट्रिप आयोजित करत सोबत दोन मुलींना सोबत पाठवण्याची तयारी दर्शवली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

यानंतर पोलिसांनी विमानतळावरच अटकेची तयारी केली होती. तिथे तीन तरुणी अधिकारी आणि ग्राहकाच्या वेषात असणाऱ्या इतरांना भेटल्या असता कारवाई कऱण्यात आली. यावेळी पैसे आणि विमान तिकीटाची देवाण घेवाण करण्यात आली. सिग्नल मिळताच तिन्ही तरुणींना ताब्यात घेण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.

चौकशी केली असता पोलिसांना मुख्या आरोपीची माहिती मिळाली. मुख्य आरोपी असणाऱ्या महिलेने डिपार्चर गेटमधून प्रवेश करत बोर्डिंग पास घेतला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.