येरवडा (प्रतिनिधी) – येरवडा आर.के.चौक येथे करोना बाधित महिला रुग्णाने अँब्यूलन्समध्ये बसण्यास नकार देऊन सैरावैरा धावू लागल्याने काही वेळ गोंधळ उडाला होता. मात्र पोलिसांनी समजावून सांगून त्या महिलेस रुग्णालयात पाठविले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,येरवडा पोलीस स्टेशन अंकित लक्ष्मी नगर चौकीच्या हद्दीत आर.के.चौक येथे 2 करोना बाधित रुग्ण असल्याची व त्यांना नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स आल्याची माहिती मिळाली मात्र त्यातील एक महिला रुग्ण ऍम्ब्युलन्समध्ये जाण्यास नकार देऊन इकडे तिकडे सैरावैरा धावत होती. त्यामुळे तेथिल नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
मात्र पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे,पोलीस शिपाई विष्णू सरवदे,नितीन बोराटे,सागर कोतवाल विनायक साळवे यांनी त्या महिलेला योग्य ती खबरदारी घेऊन ताब्यात घेतले.त्या महिलेचे व तिच्या नातेवाईकांना समजावून त्यांचे योग्य ते मार्गदर्शन करून त्यांचे मनपरिवर्तन केले व त्या महिलेस औषधोपचार करण्यासाठी रुग्णालयात पाठविले