प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 11 -मार्केट यार्डात मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर आहे. शेवगा, फ्लॉवर, सिमला मिरची वगळता उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. अवक वाढल्याने फ्लॉवर, सिमला मिरचीच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी घट झाली आहे. तर, केवळ मागणी जास्त असल्याने शेवगाच्या भावात वाढ झाली आहे. पुणे विभागात झालेल्या पावसाचा फटका टोमॅटोच्या पिकाला बसला आहे. येथील बाजारात जवळपास 75 ते 80 टक्के माल हलक्या प्रतीचा दाखल होत आहे.
येथील तरकारी विभागात रविवारी (दि. 11) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 80 ते 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात येथून सुमारे 5 ते 6 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात येथून 3 टेम्पो कोबी, इंदौर येथून 7 ते 8 टेम्पो गाजर, गुजरात येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो घेवडा तर मध्य प्रदेश येथून लसणाची 10 ते 12 ट्रक इतकी आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 600 पोती, टोमॅटो 7 ते 8 हजार पेटी, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, भुईमूग 50 ते 60 गोणी, मटार 400 गोणी, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा 50 ट्रक यांसह इंदूर आणि आग्रा, इंदौर येथून बटाटयाची 40 ते 42 ट्रक इतकी आवक झाल्याची माहिती ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा120-160
बटाटा170-220
लसूण100-400
आले सातारी100-400
भेंडी300-400
गवार :
गावरान व सुरती300-500
टोमॅटो100-200
दोडका350-400
हिरवी मिरची250-300
दुधी भोपळा100-200
चवळी200-250
काकडी120-160
कारली हिरवी300-350
पांढरी200-250
पापडी350-400
पडवळ250-280
फ्लॉवर100-120
कोबी100-160
वांगी150-250
डिंगरी200-250
नवलकोल80-100
ढोबळी मिरची250-300
तोंडली :
कळी300-350
जाड200-250
शेवगा1000-1200
गाजर300-400
वालवर350-400
बीट180-200
घेवडा400-500
कोहळा100-150
आर्वी200-250
घाेसावळे200-250
ढेमसे200-220
भुईमुग शेंग450-500
मटार400-700
पावटा400-450
तांबडा भोपळा60-100
सुरण200-220
मका कणीस60-100
नारळ (शेकडा) 1000-1600.