“पंढरपूरात भाजपचा आमदार हा राज्य सरकारविरोधातील जनतेचा कौलच”

मुंबई – राज्यातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल असल्याने पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांसोबत या निकालाचीही उत्कंठा शिजे पोहचली आहे. पंढरपुर पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे तर महाविकास आघाडीचे भगीरथ भालके यांच्यात थेट लढत झाली होती.

हाती आलेल्या माहितीनुसार भाजपचे समाधान अवताडे यांनी सध्या विजयी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. ही निवडणूक महाविकास आघाडी व भाजपने संपूर्ण ताकदीने लढवल्याने प्रतिष्ठेची झाल्याचं प्रचार कालावधीत दिसून आलं होतं.

दरम्यान, पंढरपूर येथे समाधान अवताडे यांचा विजय जवळपास निश्चित समजला जात असल्याने भाजप नेते महाविकास आघाडीवर टीका करताना दिसतायेत. अशातच, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील याबाबत भाष्य करताना महाविकास आघाडीला लक्ष्य केलं.

“आघाडीची पूर्ण ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार ठाणं मांडून बसलेले, टप्प्यात आल की गेम करण्याची भाषा करणारे जयंत पाटील यांचे दौरे, नाना पटोले यांची सभा प्रशासनाचा फौजफाटा साम, दाम, दंड, भेद, सगळ करूनही जनतेने नाकारले. पंढरपूरात भाजपाचा आमदार हा राज्य सरकारविरोधातील जनतेचा कौलच” असं उपाध्ये यांनी म्हटलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.