मुंबई – सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांपेक्षा कोरोना मुक्त झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. मागील 24 तासात 14 हजार 578 जणांना कोरोनाची बाधा झाली असून आज दिवसभरात एकूण 16 हजार 715 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज कोरोनामुळे 355
जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 14 लाख 80 हजार 498 असून यात 39 हजार 72 रूग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर आत्तापर्यंत 11 लाख 96 हजार 441 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मंगळवारी राज्यात कोरोना बाधित रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त होती. एकूण 12 हजार 958 कोरोना बाधित रूग्ण आढळले, तर 17 हजार 141 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
राज्यात अजूनही 2 लाख 44 हजार 527 अॅक्टिव्ह रूग्ण असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोना बाधित रूग्णांपेक्षा कोरोना मुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.