शिरुर : तब्बल 4 कोटी 51 लाख 58 हजार रुपयाचे सिगारेट दरोडा टाकून चोरून पळून जाणाऱ्या दोन ट्रकला फिल्मी स्टाईल पाटलाग करून पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिसाच्या पथकाने शिरुर सतरा कमानी पुलाजवळ अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण चार कोटी 91 लाख 79 हजार पाचशे रुपये चा माल हस्तगत आहे. टोळीने सुपा मोरगाव मार्गावर सिगारेटने भरलेला कंटेनर चालकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कंटेनर हायजॅक केले होते.
या प्रकरणी सात जणांना अटक केली असून हे सातही आंतरराज्य टोळीतील कुख्यात गुन्हेगार आहेत अशी माहिती पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे. ज्या गुन्हेगारांनी सात विविध राज्यांमध्ये हे दरोडा टाकून लूटमार केल्याच्या घटनेत अनेक राज्यांना हवे असलेले गुन्हेगार आहेत. या आंतरराज्य टोळी ने कर्नाटक, आंध्रा, ओडिसा , हरियाणा, उत्तर प्रदेश,, पश्चिम बंगाल,महाराष्ट्र यासह अनेक राज्यात मोठे दरोडे टाकून लूटमार केली केली आहे.
पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे या मोठ्या आणि धाडसी कारवाईचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कौतुक केले आहे.
दिनेश वासुदेव झाला (वय 50 टॉककला देवास,) सुशील राजेंद्र झाला ,मनोज केशरसिंग गुडेन रा. ओढगाव, मनोज उर्फ गंजा राजाराम सिसोदिया रा. भैरवखेडी, कल्याण सदुल चव्हाण रा ओढागाव, सतीश अंतर सिंग झा रा. ओढगाव देवास, ओम प्रकाश कृष्णा झाला रा भैरव खेडी सर्व राहणार जिल्हा देवास मध्य प्रदेश या आंतरराज्य टोळीच्यासात जणांना अटक करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग या टोळीचा एका गुन्ह्यात तपास करत होती यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग टीम नोव्हेंबर 2019 पासून मेडिसिन लुटमारीच्या गुन्ह्यात या आरोपींचा शोध घेत होती. यासाठी मध्य प्रदेश मधील देवास इंदोर येथे जाऊन या गुन्हेगारांची माहिती फोटोसह हस्तगत करण्यात गुन्हे अन्वेषण विभागाने यश मिळवले होते.
म्होरक्यांनी शिरूर रांजणगाव औद्योगिक वसाहत या परिसरातही या टोळीच्या म्होरक्यांनी रेकी केली होती. याबाबतची सर्व माहिती पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाने घेतली होती. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला वरील पाच आरोपी पैकी व एका मेडिसिन लूटमार प्रकरणी हवे असलेला आरोपी हा एका ट्रक मधून चौफुला शिरूर दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. यावर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, दत्तात्रय गिरमकर ,महेश गायकवाड, उमाकांत कुंजीर , राजू मोमीन, जनार्दन शेळके,मुकुंद आयावित, मोरेश्वर ईनामदार, राजेंद्र पुणेकर ,अनिल काळे, रविराज कोकरे ,विजय कांचन ,गुरु गायकवाड, गुरु जाधव, सुभाष राऊत , रोफ इनामदार धीरज जाधव, प्रमोद नवले, सावंत अक्षय जावळे. हे पोलीस पथक ट्रक चा फिल्म स्टाईल ने पाठलाग करीत होते.
ट्रक अहमदनगर बाजूकडे भरधाव वेगात जात असल्याचे दिसताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काबुगडे, पोलीस कॉन्स्टेबल सुदाम खोडदे, जितेंद्र मांडगे, कल्पेश राखुंडे यांच्या पथकास शिरूर येथे सतरा कमानी पुलाजवळ नाकाबंदी करून ट्रॅफिक जाम करण्यास सांगितली.
त्याप्रमाणे नाकाबंदी करताच दोन्ही वाहने ट्राफिक जाममध्ये अडकल्यानंतर एका ट्रकमधील आरोपी उडी मारुन पळुन गेले ,तर दुसऱ्या ट्रक मधील आरोपीने नाकाबंदी च्या जवळील रस्ता दुभाजकावर ट्रक चढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही ट्रक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या टाटा कंपनीच्या 3118 मॉडेल दोन ट्रक मधून रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील आयटीसी कंपनीच्या सिगारेट भरलेले चार कोटी 51 लाख 58 हजार चारशे किमतीचे एकूण 588 बॉक्स हस्तगत केले आहे.
पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेण्याकरता स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रात्री अंधारात आरोपी असलेल्या भागावर देखरेख ठेवून पोलिस मित्रांच्या मदतीने सकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. पकडलेल्या इसमाकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी सिगरेट सुपे ते मोरगाव रोड वरून सिगारेट ने भरलेला कंटेनर हायजॅक करून दरोडा टाकून लुटून आणल्याची माहिती दिली. सदर सात आरोपींनी कंटेनर हायजॅक केल्यानंतर कंटेनर मधील ड्रायव्हरला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ट्रकमधून पळून नेऊन त्याला टेंभुर्णी येथे सोडून दिले असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेले आरोपी आंतरराज्य टोळीतील कुख्यात व सराईत गुन्हेगार असून त्यांनी यापूर्वी पुणे ग्रामीण हद्दीतील शिक्रापूर पोलीस स्टेशन यवत पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले.
यांच्याकडून कंटेनर मधून दरोडा टाकून लुटलेले 4 कोटी 51 लाख 58 हजार चारशे रुपयाची ५८८ सिगरेट बॉक्स, रोख 13 हजार 600 रुपये, 6 मोबाईल, दोन ट्रक, एक बनावट रिवाल्वर, बनावट नंबर प्लेट, चोपर ,चाकु, असा एकूण ४ कोटी 91 हजार 79 हजार पाचशे रुपयाचा माल हस्तगत केला आहे.