Gujarat – गुजरातमध्ये ( Gujarat ) खेडा जिल्ह्यात आयुर्वेदीक कफ सिरप ( cough syrup ) प्रकरणी सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. खेडा येथे सहा जणांचा मृत्यू झाला होता.
कफ सिरप प्रकरणासंदर्भात गुजरातमधील सुरत येथे सात ठिकाणी छापे टाकण्यात आले असून एकूण २१९५ बाटल्या जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुरतचे एसओजीचे डीसीपी राजदीप नकुम म्हणाले, खेडा येथे आयुर्वेदिक सिरप प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर, आयुर्वेदिक सिरप विकणाऱ्यांना पकडण्यासाठी संपूर्ण गुजरातमध्ये पोलिस तैनात करण्यात आले होते.
त्यानंतर सुरत पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने ही कारवाई केली. तैनात करण्यात आले आहे. याला मोठे यश मिळाले आहे. सुरत पोलिसांनी २१९५ बाटल्या जप्त केल्या आहेत.
या प्रकरणी गोदादरा येथून एक, कापोद्रा येथून दोन, वराछा येथे दोन, पुण्यातील एक आणि अमरोली परिसरातून एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
जप्त केलेल्या सिरपमधील अल्कोहोलचे प्रमाण तपासले जात आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या सर्व सिरपचा एफएसएल अहवाल आल्यानंतर तपास सुरू केला जाईल. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.