मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुपुत्र अमित ठाकरे यांनी आपल्या लाडक्या लेकाची पहिली झलक शेअर केली. बाळाने चिमुकल्याच्या हाताने अमित ठाकरे यांची करंगळी पकडलेला हा फोटो आहे. अमित ठाकरे यांनी आपल्या चिमुकल्याचा फोटो शेअर करताना अमित ठाकरे यांनी ‘हार्ट’ची इमोजी वापरली आहे.
अमित ठाकरे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळाचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे बाळाचा चेहरा पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, फोटो शेअर केल्यानंतर त्यावर लव्ह आणि लाईक्स पाऊस पडला आहे. तर हजारो जणांनी कमेंट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमित ठाकरे यांच्या बाळाचे नामकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे नव्या राजकुमाराचे नाव काय ठेवणार याचीही उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
दरम्यान याच महिन्यात 5 एप्रिल रोजी राज ठाकरे यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात मिताली यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. ठाकरे कुटुंब नुकतंच कृष्णकुंज हे निवासस्थान सोडून शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी राहायला गेलं. तिथे राहायला गेल्यानंतर नव्या वास्तूत लगेचच चिमुकल्याचं आगमन झालं.
नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याने ठाकरे कुटुंबामध्ये आनंदाचे वातवरण पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंना नातू झाला ही बातमी समजताच कार्यकर्त्यांनीही मोठा जल्लोष केला. अमित ठाकरेंना पुत्ररत्न झाल्याचे समजताच शिवतीर्थावर पेढे वाटप करण्यात आले.