बॉलीवूडमध्ये वशिलेबाजीपेक्षा जातीयवादच अधिक आहे-नवाजुद्दीन

नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या अभिनयाबरोबर त्याच्या परखड वक्‍तव्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. त्याने बॉलीवूडबद्दल असेच एक बिनधास्त वक्‍तव्य केले आहे. बॉलीवूडमध्ये वशिलेबाजी आहे, अशी टीका केली जाते आहे. मात्र, यापेक्षाही बॉलीवूडमध्ये जातीयवादच अधिक आहे.

हा जातीयवादच सध्या अतिशय जोरात सुरू आहे. वशिलेबाजीपेक्षाही हा जातीयवादच अधिक धोकादायक आहे, असे नवाजुद्दीन सिद्दीकीने म्हटले आहे. एकवेळ या वशिलेबाजीविरोधात लढता येऊ शकेल. मात्र, या जातीयवादाविरोधात कसे लढणार, असा प्रश्‍नही त्याने उपस्थित केला आहे. आपली उंची कमी असल्यामुळे आपल्याला अनेक वर्षे इंडस्ट्रीने चांगले रोल नाकारले होते, अशी आठवणही त्याने सांगितली.

मात्र, तेव्हा आपल्याला जी वागणूक दिली गेली त्याबद्दल आपण आता कोणाकडेही कोणतीही तक्रार करू शकत नाही, असेही तो म्हणाला. आपल्यापेक्षाही अनेक मोठ्या कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये जातीयवादी वागणूक मिळाली आहे. त्यांच्यावरही थोडा फार अन्याय झाला आहे, असेही तो म्हणाला. नवाजुद्दीन सिद्दीकीकडे सध्या अनेक सिनेमे आहेत. त्यात “बोले चुडीया’, “जोगीया सारा रा रा’, “हिरोपंती 2′ सारख्या सिनेमांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.