बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कालच आपला 79 वाढदिवस साजरा केला. संपूर्ण बॉलीवूडने त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांची एनर्जी आणि काम करण्याची ऊर्मी तरुणांनाही लाजवेल अशी आहे. अमिताभ बच्चन यांच्या लाखो चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सलमान खानचे वडील आणि लेखक सलीम खान यांनीही बच्चन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, एक अनाहूत सल्लादेखील दिला आहे. त्यामुळे बिग बी यांचे फॅन्स नाराज झाले आहेत. बिग बी यांनी आता बॉलीवूडमधून रिटायर्ड व्हायला पाहिजे, असा सल्लाही सलीम खान यांनी दिला आहे. आता बच्चन यांनी आयुष्यातील काही वर्षे फक्त स्वतःसाठी जगायला पाहिजे. काम करणे थांबवले पाहिजे. थोडा आराम केला पाहिजे.
हल्ली बॉलीवूडमध्ये बच्चन यांच्यासाठी कोणतीही विशेष कथा लिहिली जात नाही. आता इंडस्ट्रीमध्ये म्युझिक, टेक्नोलॉजी आणि ऍक्शनच्या निकषावर खूपच सुधारणा झाली आहे. मात्र, आता चांगली स्क्रिप्ट उपलब्ध होत नाहीत, हे ध्यानात घेतले पाहिजे, असे सलीम खान यांनी म्हटले आहे.