वाठार स्टेशन येथे महाबॅंकेची शाखा गैरसोयीच्या ठिकाणी

बॅंकेचे चांगल्या जागी स्थलांतर व्हावे : ग्राहकांची मागणी

वाठार स्टेशन – वाठार स्टेशन येथे बॅंक ऑफ महाराष्ट्राची शाखा भाड्याच्या जागेत गेल्या 20 ते 22 वर्षांपासून आहे. मात्र, बॅंकेत जाण्यासाठी ग्राहकांना रस्ता शोधावा लागत असल्याची परिस्थिती आहे. ग्राहकांना बॅंकेकडून कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. बॅंकेतील शौचालय ग्राहकांसाठी नाही.
राष्ट्रीयीकृत बॅंकेची शाखा असल्याने या ठिकाणी एक ते दहा तारखेपर्यंत पेन्शनरांच्या रांगा लागतात. सरकारी नोकरांचे पगार याच बॅंकेत आहेत.

पेन्शनरांना बॅंकेच्या जिन्यातून चढ-उतार करताना त्रास होत असते. पूर्वी जिना रस्त्याच्या बाजूला होता; परंतु जागा मालकाने तो जिना काढून टाकून त्याच्या दुकानाच्या गोदामाकडे जाणारा जिना बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या ग्राहकांना वापरण्यास दिला. हा जिना अडचणीचा असून तेथे अंधार असतो. त्यामुळे बॅंकेची शाखा दुसऱ्या जागी खालच्या मजल्यावर स्थलांतरित करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

गैरसोय लवकरात लवकर दूर करावी

मी पेन्शनर आहे. मला बॅंकेतील जिन्यातून चढ-उतार करताना धाप लागते. जिन्यात अंधार असल्याने चाचपडत पायऱ्या चढाव्या लागतात. तेथे लूटमार होण्याची शक्‍यता आहे. बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ग्राहकांची होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर करावी.
– महादेव गायकवाड, वाठार स्टेशन.

Leave A Reply

Your email address will not be published.