नवी दिल्ली – माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अटक येथील तुरुंगात विषप्रयोग केला जाऊ शकतो, असा दावा खान यांच्यापत्नी बुशरा बिबी यांनी केला आहे.
इम्रान खान यांना तुरुंगात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशी मागणीही त्यांनी पंजाब प्रांताच्या गृह सचिवांना लिहीलेल्या पत्रात केली आहे.
इम्रान खान यांना रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र तरिही प्रशासनाने इम्रान खान यांना इस्लामाबादेतील अटक येथे ठेवण्यात आले असल्याचेही बुशरा बिबी यांनी म्हटले आहे.