इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान मुळीच प्रामाणिक नसून त्यांना विविध स्तरातील लोकांकडून दरमहा पैसे गिफ्ट म्हणून दिले जातात पाकिस्तानमधील शुगर माफिया इमरान खान यांना दर महिन्याला पन्नास लाख रुपये घर खर्चासाठी देतो, असा आरोप पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टातील निवृत्त न्यायाधीश वजीउद्दीन अहमद यांनी केला आहे.
वजीउद्दीन हे एकेकाळचे इम्रान खान यांचे राजकीय सहकारी होते इम्रान खान यांच्या राजकीय पक्षात त्यांनी काम केले होते पण नंतरच्या काळात इमरान खान आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांची भ्रष्ट वागणूक लक्षात आल्याने त्यांनी या पक्षातून आणि राजकारणातून बाजूला जाण्याचा निर्णय घेतला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इमरान खान यांच्या भ्रष्ट वागणुकीचे अनेक किस्से सांगितले आहेत. इम्रान खान कोणताही खर्च स्वतःच्या खिशातून करत नाही तर त्यांचा प्रत्येक खर्च कोणी ना कोणी बडी असामी स्पॉन्सर करत असते असा दावाही जस्टीस वजीउद्दीन यांनी केला आहे.
पाकिस्तानमधील जहांगीर तरीन या उद्योगपतीला शुगर माफिया म्हणून ओळखले जाते तरीन यांच्याकडून दर महा इमरान खान यांच्या इस्लामाबाद मधील बंगल्यावर पन्नास लाख रुपये पाठवले जातात. इम्रान पंतप्रधान नसताना जहांगीर तरीन त्यांना दरमहा वीस लाख रुपये देत असत नंतर ही रक्कम तीस लाख रुपयांवर गेली आणि इमरान खान पंतप्रधान झाल्यावर आता त्यांना दरमहा पन्नास लाख रुपये देत आहेत.
इमरान खान यांच्या गाडीतील मोटारीचे पेट्रोल भरण्याची जबाबदारीही अशाच एका उद्योगपती व्यक्तीवर सोपवण्यात आली आहे. इमरान खान कपडे किंवा पादत्राणे किंवा बूट वापरतात तो खर्चही त्यांचे कोणते ला कोणते मित्र करतात असेही वजीउद्दीन यांनी म्हटले आहे.
इम्रान खान यांचे सरकार स्थापन व्हावे म्हणून जहांगीर तरीन यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला होता. इम्रान यांच्या या भ्रष्टाचारी वागणुकीची माहिती त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना असून कोणीही याबाबत स्पष्टपणे बोलत नाही, असेही जस्टीस वजीउद्दीन यांनी म्हटले आहे.