Chief Justice Dhananjay Chandrachud – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बुधवारी या पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. या वेळी त्यांनी सार्वजनिक जीवनावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर निर्णय दिले आणि पुढील काळात न्याय वितरण प्रणालीची कार्यक्षमता वाढवणाऱ्या सुधारणा सुरू केल्या.
गेल्या वर्षी 9 नोव्हेंबर रोजी भारतीय न्यायपालिकेचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणाऱ्या न्या. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली, सर्वोच्च न्यायालयाने न्यायपालिकेतील पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयात एलजीबीटीक्यु+ समुदायाचा समावेश करण्याच्या दिशेने अनेक पावले उचलली.
तांत्रिक, प्रशासकीय आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी उपक्रम सुरू करण्याव्यतिरिक्त, न्या. धनंजय चंद्रचूड यांनी गेल्या एका वर्षात अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिले. त्यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने निर्णय दिला की, दिल्ली सरकारला सार्वजनिक सुव्यवस्था, पोलिस आणि जमीन वगळता सेवा प्रशासनावर विधायक आणि कार्यकारी अधिकार आहेत. तथापि, केंद्राने नंतर हा निर्णय मागे घेण्यासाठी कायदा केला आणि सेवांशी संबंधित बाबींमध्ये लेफ्टनंट गव्हर्नरचे प्राधान्य प्रस्थापित केले.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पुनर्स्थापित करता येणार नाही कारण ठाकरे यांनी सभागृहात मतविभाजनाचा सामना न करता राजीनामा दिला होता. याबाबतचा ऐतिहासिक निर्णयही न्या. चंद्रचुड यांनीच दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने सामायिक केलेल्या निवेदनात 50 वे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयांची यादी प्रसिद्ध केली आहे.
न्या. यशवंतराव चंद्रचुड दीर्घकाळ सरन्यायाधिश…
चंद्रचुड यांचे वडील जस्टिस यशवंतराव चंद्रचूड हे सर्वाधिक काळ देशाचे सरन्यायाधीश होते. ते 22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 या काळात भारताचे सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश होते. ल्युटिएन्स दिल्ली येथील अधिकृत बंगल्याच्या कर्मचाऱ्यांसोबत क्रिकेट खेळण्याची आवड न्या. धनंजय यांना होती. सरन्यायाधीश या नात्याने न्या. चंद्रचूड यांनी विवाह करू इच्छिणाऱ्या समलिंगी जोडप्यांना समान हक्कांची वकिली केली होती.