पुणे -तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरून अंतिम करण्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
तंत्रशिक्षण विभागअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती आणि अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती या योजनेसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
यापूर्वीच सर्व संस्थांना महाडीबीटी पोर्टलवरून योजनांच्या लाभासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यात यावे, असे स्पष्ट केले आहे.