“मी आत्महत्या करतोय, माझं शूटिंग करा”; नाशिकमधील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक : नाशिकमधील एका तरूणाने दारणा नदीच्या पुलावरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणाने ‘मी आत्महत्या करतोय माझी शूटिंग काढा’ असे म्हणत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हा सगळा प्रकार नाशिकमधील दारणा नदीच्या पुलावर घडला आहे. सुदैवाने या तरुणाचे प्राण वाचले आहेत. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

नाशिकमधील दारणा नदीच्या पुलावरुन एका तरुणाने उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हि घटना सोमवारी दुपारी घडली. या तरुणाने आत्महत्या करताना “माझी शूटिंग काढा, मी नदीत उडी मारत आत्महत्या करत आहे” असे ओरडून सांगितले. त्यावेळी तेथून जाणाऱ्या नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. हा नेमका काय प्रकार आहे हे नागरिकांना समजले नाही.

हा सगळा प्रकार पाहून काही लोकांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कठड्याला धरलेला हात सोडला आणि मग तो खाली नदी पात्रात कोसळला. या घटनेची माहिती मिळताच पोलीससुद्धा घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलीस आणि स्थानिकांनी या तरुणाला नदी पात्रातून बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या तरुणावर सध्या नाशिकमधील बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला? याचे कारण अजून समजू शकले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.