मुंबई – ड्रामा क्वीन राखी सावंत प्रत्येक सामाजिक मुद्दयावर आपला व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करत असते. तिच्या मताची कोणी दखल घेओ अथवा न घेओ, त्याच्याशी राखीला काहीही घेणे देणे नसते. तिच्या मताचा व्हिडीओ पब्लिकने बघावा, एवढीच तिची अपेक्षा असते.
View this post on Instagram
अशातच सोशलवर तिचा एक डान्स व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये ‘टिप टिप बरसा पानी’ या पावसाच्या गाण्यावर तिने डान्स केला आहे. मुंबई मान्सून दाखल झाला आहे . त्यामुळे तिने रविना टंडन आणि अक्षय कुमार यांचे मोस्ट पॉपुलर ‘टिप-टिप बरसा पानी ‘ या गाण्यावर तिने बिंदास डान्स केलेला दिसून येत आहे.
View this post on Instagram
सध्या तिच्या या व्हिडियोला नेटकऱ्यांकडून कॉमेंट्स वर्षाव होत आहे. आता पर्यंत या व्हिडियोला 397,415 नेटकऱ्यांनी बघतले आहे. तिचा व्हिडियो सोशलवर धुमाकूळ घालत आहे.
View this post on Instagram
यापूर्वी तिने तिच्या बायोपिक बनणार असेल असल्याचे सांगितले होते. यामध्ये तिची भूमिका आलिया भट्टने करावी अशी इच्छा तिने यावेळी व्यक्त केली .