बॉलिवूडमध्ये असे फार कमी कलाकार आहेत जे कधीच आपले प्रेमसंबंध इतरांपासून लपवत नाहीत. त्यात अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिचा समावेश होतो. इलियाना तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या ऑस्ट्रेलियन प्रियकर अँड्रयू नीबोनचे फोटो नेहमीच शेअर करत असते. जवळपास गेल्या दहा वर्षांपासून हे दोघे एकत्र असून त्यांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र, सध्या या जोडीमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे दिसत आहे. इलियाना आणि अँड्रयूने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले असून पेजवरील एकमेकांसोबत असलेले फोटोसुद्धा डिलीट केले आहेत. त्यामुळे इलियाना आणि अँड्रयू यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.
एका एंटरटेन्मेंट वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांचे ब्रेकअप झाले असून ते एकमेकांशी बोलत नसल्याचे कळत आहे. इलियानाचे इन्स्टाग्रामवरील स्टेटस पाहून ती ब्रेकअपला सामोर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतेय. “जोपर्यंत तुम्ही ओझ खाली ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला ते ओझ असल्याच कळत नाही,’ अस तिने एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
तत्पूर्वी, इलियानाने तिच्या बऱ्याच सोशल मीडियावरील पोस्टवर अँड्रयूचा उल्लेख “हबी’ (पती) असा केला होता. त्यामुळे हे दोघ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचेही म्हटले जात होते. इलियानाला याआधी एका मुलाखतीत लग्नाबद्दल विचारले असता ती म्हणाली होती, सध्या माझ खासगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य चांगल सुरू आहे. मला माझ खासगी आयुष्य सर्वांसमोर आणायचे नाही.