नवी दिल्ली : अब्दुलाये कनौते याच्या दोन गोलच्या जोरावर आयजोल एफसी संघाने मंगळवारी झालेल्या आय लीग फुटबाॅल स्पर्धेच्या सामन्यात टिडिम रोड एथलेटिक यूनियन (टीआरएयू) एफसी संघाचा २-० ने पराभव करत विजय नोंदविला.
सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघाची गोलशून्य बरोबरी होती. पण, सामन्याच्या उत्तरार्धात आयजोल एफसीच्या अब्दूलाये कनौतेने आकम्रक खेळ करत ७६ व्या आणि ८७ व्या मिनिटाला गोल करत संघास विजय मिळवून दिला.
FULL-TIME ⌛
Abdoulaye Kanoute came 🔀
He scored 🏐 twice ✌
And he conquered the 3⃣ points 🤯AFC 2⃣-0⃣ TRAU#AFCTRAU ⚔ #HeroILeague 🏆 #LeagueForAll 🤝 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/KyqIFIrOLL
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 11, 2020
या विजयासह आयजोल एफसी संघाचे १४ गुण झाले असून ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. तर, पराभूत टीआरएयूचा संघ १५ गुणासह चौथ्या स्थानी कायम आहे.