लाखणगांव – पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने विविध साहित्यांचे वाटप माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. पोंदेवाडी येथील गडदादेवी भजन मंडळास भजनी साहित्य, माध्यमिक विद्यालयाला ढोल लेझीम साहित्य, बेंजो साहित्य व 11 गरजू महिलांना पीठ गिरणी वितरण करण्यात आले. यावेळी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, उपसरपंच संदीप पोखरकर, जयसिंग पोंदे, आनंदराव पोंदे, ओंकार डोके, नानाभाऊ पोखरकर व ग्रामस्थ उपस्थित होते.