पोलिस अधिक्षकांच्या सूचनेवरून प्रियांका गांधी नाराज
मीरत : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना पोलीस अधिक्षकांनी पाकिस्तानात जायला सांगितल्यामुळे वाद निर्मण झाला आहे. कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपने व्यवस्थेमध्ये जातीय वीष पेरल्याची टीका त्यांनी केली.
ही घटना 20 दिसेंबरला उत्तर प्रदेशातील लिसारी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली. मीरतमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मीरतचे पोलीस अधिक्षक अखिलेश नारायण सिंह हे एका अरुंद गल्लीमध्ये काही आंदोलकांबरोबर बोलत असताना त्यांनी आंदोलकांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला होता.
या घटनेचा 1 मिनिट 43 सेकंदांचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे.
प्रियांका गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज्यघटनेने नागरिकांशी अशा भाषेत बोलण्याची परवानगी दिलेली नाही. विशेषतः महत्वाच्या पदावरील अधिकारी असताना तर जबाबदारी अधिकच वाढते, असे म्हटले आहे.
कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लखनौमध्ये आल्या असताना प्रियांका गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली.