विनाकारण फिराल तर थेट हॉस्पिटलमध्ये जाल; बारामतीत विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड ॲंटीजेन टेस्ट

60 जणांच्या तपासणीत 5 जण पॉजिटिव्ह
बारामती:
राज्य सरकारने आजपासून कडक टाळेबंद जाहीर केली आहे, याची अंमलबजावणी बारामतीत पोलिसांकडून सुरु करण्यात आलीय… टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्या नागरीकाना रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेने अनोखी शक्कल लढवली आहे.

नाहक रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरीकांची आरोग्य प्रशासनाच्या मदतीने रॅपिड ॲंटीजेन तपासणी करण्यात येतेय. यात 5 जण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कडक टाळेबंदी लागू आहे त्यामुळे नागरिकांनी बाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शीरगावकर यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.