दहशतवादाला पाठींबा देणे पाकने थांबवले नाही तर देशाचे तुकडे होतील

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकवर हल्लाबोल

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारताने रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत गेला आहे. त्यातच पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया दिवसेंदिवस वाढतच जात आहेत, याच पार्श्‍वभूमीवर आता केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन देणे थांबवावे, अन्यथा या देशाचे तुकडे होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला.

जर पाकिस्तानी नागरिकांनी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर भारतीय लष्कर त्यांना परतण्याची संधीच देणार नाही, असा इशारा देखील संरक्षणमंत्र्यांनी दिला. शनिवारी, गुजरातच्या सुरतमध्ये 122 शहिदांच्या कुटुंबीयांचा एका कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी पीओकेमधील मुझफ्फराबादमध्ये बोलताना, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत पाकिस्तानी नागरिकांनी नियंत्रण रेषेकडे कूच करु नये असे वक्तव्य केले होते. यावरुन बोलताना राजनाथ यांनी, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या नागरिकांना नियंत्रण रेषा ओलांडू नका, असा उत्तम सल्ला दिला आहे. कारण, भारतीय सैन्य सज्ज आहे ते तुम्हाला परतण्याची संधी देणार नाही, असा इशारा दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here