गडचिरोलीमध्ये २ नक्षलवादी ठार 

गडचिरोली – जिल्ह्यात आज पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये २ नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात ही चकमक सुरू होती.

सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान या भागात राबवत होते. नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २ नक्षलींचा खात्मा झाला. त्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×