नगर -लालटाकी रस्त्यावरील जिल्हा रुग्णालय परिसरात 100 ते 150 वर्षापूर्वीचे पुरातन लक्ष्मी आईचे मंदिर आहे. हे मंदिर पाडण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न झाल्यास गवळी समाजाबरोबरच सर्व धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणार असून, भक्तांमध्ये तीव्र संताप निर्माण होणार आहे. हे मंदिर पाडल्यास सामूहिक आत्मदहन करणार असे, वीरशैव लिंगायत गवळी समाज ट्रस्टच्यावतीने प्रशासनास देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी अध्यक्ष प्रकाश भागानगरे, उपाध्यक्ष रखमाजी निस्ताने, हिरामन बेंद्रे, संतोष गेनप्पा, सतिष हरबा, सुभाष भागानगरे, हुच्चे भाऊसाहेब, गोविंद मिसाळ, आप्पा बारसे, चंद्रकांत औशिकर, विष्णू कलागते, संतोष उन्हाळे, शंकर पंगुडवाले आदी उपस्थित होते.
हे मंदिर गवळी समाजाबरोबर सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असून, या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पाडत असतात. हे पुरातन मंदिर जिल्हा रुग्णालया पासून अगोदर आहे.
सध्या या मंदिरात करोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलेही धार्मिक कार्यक्रम साजरे केले गेले नाही. येथून पुढील काळातही शासनाच्या नियम व आदेशाप्रमाणे धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येईल. तरी मंदिर पाडण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न झाल्यास गवळी समाजाबरोबरच सर्व धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणार असून, भक्तांमध्ये तीव्र संताप निर्माण होणार आहे. या धार्मिक भावना दुखावणार असल्यामुळे मंदिर पाडण्याचा परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल, असे निवेदनात म्हटले आहे.