जुन्नर -जुन्नर तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी दिवसाला करोनाचे एक-दोन रुग्ण सापडत होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून दिवसाला सरासरी 10 पेक्षा अधिक रुग्ण आढळत असून तालुक्यात करोना रुग्णांचा आलेख उंचावत आहे. दरम्यान, शनिवारी (दि. 11) 16 बाधित आढळले असून तिघांना घरी सोडले आहेत.
जुन्नर तालुक्यात आतापर्यंत बाधितांची संख्या 137वर पोहोचली आहे. यात 72 जण करोनावर मात करीत घरी परतले असून 62 जणांवर उपचार सुरू आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सर्व खबरदारी घेत प्रशासनाने त्यांचे अंतिमसंस्कार केले आहेत. दरम्यान, जुन्नर नगरपालिका प्रशासन तसेच तालुक्यातील लॉकडाऊनचे नियम कडक करण्याची शक्यता आहे.
तालुका लॉकडाऊनच्या दिशेने
जुन्नर शहर व तालुक्यातील वाढते रुग्ण पाहता सोमवारपासून (दि. 13) लॉकडाऊनचे नियम कडक होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या संपूर्ण लॉकडाऊन प्रमाणेच तालुक्यातही होण्याची शक्यता आहे.