उल्हासनगर : मुंबईतील उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बुद्धविहारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पंचधातूची मूर्ती चोरून नेण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही कैद झालेल्या घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पंचधातूची १ फुटाची मूर्ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील ओटी सेक्शनमधील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जेतवन बुद्धविहार आहे. येथून हि मूर्ती घेऊन चोरटा चोरी करून जातांना दिसत आहे.
याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोरट्याला लवकरात लवकर शोधून मूर्ती परत मिळवली नाही, तर आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. त्यामुळे या चोरट्याला शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.