मोदींच्या 15 ऑगस्टच्या भाषणासाठी आयसीएमआरची घाई, करोना लसीबाबत सीताराम येचुरी यांचा आरोप

 

नवी दिल्ली- वैज्ञानिक संशोधन हे ऑर्डर देऊन पूर्ण करण्याचा विषय नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या पंधरा ऑगस्टच्या लालकिल्ल्यावरील भाषणात उल्लेख करता यावा म्हणून आयसीएमआरला करोनावरील लसीसाठी घाई केली जात आहे, असा आरोप मार्क्‍सवादी पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला आहे.

आयसीएमआरने काल शुक्रवारी या संबंधात देशातील काही प्रमुख रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांना या लसीच्या क्‍लिनिकल चाचण्या त्वरेने घेण्याची सूचना केली आहे. भारत बायोटेकच्या सहाय्याने करोनावरील कोवॅक्‍सीन ही लस तयार करण्यात आली असून त्याच्या चाचण्या सध्या घेतल्या जात

आहेत. 15 ऑगस्टला ही लस बाजारात आणण्याची योजना आहे. केवळ पंतप्रधानांना लालकिल्ल्यावरून घोषणा करता यावी म्हणून सर्व आरोग्य व सुरक्षाविषयक नियम बाजूला सारून या लसीला अनुमती देण्याचा प्रयत्न सुरू असेल तर तो घातक ठरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या लसीचे अनुकूल व त्वरीत निकाल देण्याबाबत संबंधीत संस्थांना धमकावले जात असल्याची गंभीर तक्रारही येचुुरी यांनी केली आहे. येचुरी यांनी या संबंधात अनेक प्रश्‍नही उपस्थित केले आहेत. या लसीच्या संबंधातील चाचण्यांना प्राधान्य देण्यात यावे आणि निर्धारित वेळेतच हे काम पूर्ण करावे अन्यथा संबंधित संस्थांवर कारवाई केली जाईल, असा लेखी इशारा संबंधित संस्थांना दिला गेला आहे, असेही येचुरी यांनी म्हटले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.