आठ पोलिसांचा मारेकरी विकास दुबे अजून फरारीच त्याला शोधण्यासाठी 25 पथके स्थापन

 

लखनौ – उत्तरप्रदेशात काल गुंडांकडून आठ पोलिसांची हत्या करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार व कुख्यात गुंड विकास दुबे मात्र अजून फरारीच असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी 25 पथके स्थापन केली आहेत. त्याच्या राज्यातील व राज्याबाहेरील सर्व ठिकाणांवर पोलीस छापे टाकले जात आहेत, अशी माहिती कानपूरचे पोलीस महानिरीक्षक मोहीत आगरवाल यांनी दिली. पोलिसांनी विकास दुबेच्या दोन नातेवाईकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याच्याशी संबंधीत लोकांकडेही पोलिसांची चौकशी सुरू आहे.

पाचशे मोबाइल क्रमाकांवर लक्ष ठेवले जात आहे. विकास दुबे हा कट्टर गुन्हेगार असून त्याच्या विरोधात 60 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या शोधासाठी उत्तरप्रदेश पोलिसांचे टास्क फोर्सही कामाला लागले आहे. दरम्यान कालच्या चकमकीत जखमी झालेल्या सात पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेच्या संबंधात कोणालाही सोडले जाणार नाही असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.