नवी दिल्ली – इंग्लंड येथे 30 मे पासुन क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी सुरूवात होत आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2019 चे जागतिक प्रसारण स्टार स्पोर्टसशिवाय 20 अन्य भागिदारांसोबत केले आहे. यानुसार 200 हून अधिक देशांमध्ये विश्वचषक स्पर्धेचे प्रसारण करण्यात येणार आहे.
यंदा वर्ल्डकप स्पर्धेचे भारतातील सात प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. ज्यात स्टार स्पोर्टस इंग्रजीशिवाय हिंदी, तमीळ, तेलुगू, कन्नड, बांगला आणि मराठी या भाषांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे प्रसारण करणार आहे. यामध्ये 12 सामन्यांचे एशियानेट प्लसच्या माध्यमातून मल्याळी भाषेत सुद्धा प्रसारण केले जाणार आहे. यासाठी स्टार स्पोर्टसने जगभरातील प्रसिद्ध समालोचकांची टीम तयार केली आहे.
यामध्ये जळपास 50 समालोचकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच अफगाणिस्तामध्ये क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचे प्रसारण होणार आहे. अफगाणिस्तामधील सरकारी रेडिओ, टीव्ही याचे प्रसारण करणार आहे.