दुबई : भारतीय संघाचा हिटमॅन अशी ओळख असलेला रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) गौरव करण्यात आला आहे. रोहित शर्माला या वर्षाचा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू ( आयसीसी वनडे प्लेयर आॅफ द ईयर) म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.
5️⃣ #CWC19 centuries
7️⃣ ODI centuries in 2019Your 2019 ODI Cricketer of the Year is Rohit Sharma.#ICCAwards pic.twitter.com/JYAxBhJcNn
— ICC (@ICC) January 15, 2020
रोहित शर्माने २०१९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहितने २०१९ मध्ये एकूण ७ शतके झळकावली आहेत, त्यापैकी पाच शतके ही इंग्लंड विश्वचषकात झळकवण्यात आली होती.
श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर एकाच विश्वचषकात चार शतकं करण्याचा विक्रम होता. रोहितने २०१९ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश व श्रीलंका अशा पाच देशांविरोधात शतकं ठोकत एकाच विश्वचषकात सर्वाधिक शतकं ठोकण्याचा ‘विश्व’विक्रम आपल्या नावावर केला होता. रोहितने श्रीलंकेच्याच कुमार संगकाराला मागे टाकत हा विक्रम केला.