डबलिन – वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याला इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडिज संघाची उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वेस्ट इंडिजचा डावखुरा सलामीवीर गेल याने यापूर्वी जून 2010 मध्ये वेस्टइंडिज संघाचे कर्णधारपद भूषविले होते. विश्वचषकासाठी याआधी जेसन होल्डरकडे कर्णधार पदाची धुरा देण्यात आलेली आहे. विश्वचषकात वेस्ट इंडिजचा पहिला सामना हा 31 मे ला पाकिस्तान विरूध्द होणार आहे.
39 वर्षीय गेले याविषयी बोलताना म्हणाला की, “कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये वेस्टइंडिज संघाचे प्रतिनिधित्व करणं, ही माझ्यासाठी सम्मानाची बाब आहे. आगामी विश्वचषक हा माझ्यासाठी विशेष आणि महत्वाचा आहे. एक वरिष्ठ खेळाडू म्हणून उपकर्णधार आणि संघाच समर्थन करणं ही माझी जबाबदारी आहे”.
पुढे बोलताना गेल म्हणाला की, “हा विश्वचषक माझ्यासाठी सर्वात मोठा आणि खास आहे, त्यामुळं माझ्याकडून संघाला आणि चाहत्यांना अनेक अपेक्षा आहेत. मला विश्वास आहे की, वेस्टइंडिज चाहत्यांसाठी आमचा संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल”.
#WINews: @shaidhope and @henrygayle have been named Vice Captains of the West Indies team for Ireland Tri-Nation Series and ICC Cricket World Cup, respectively 🌴🏏
Read more: https://t.co/D6L15I8a5D pic.twitter.com/rAdqlhRdZD— Windies Cricket (@windiescricket) May 6, 2019
ख्रिल गेल याने आपल्या कारकिर्दित आतापर्यंत एकूण 289 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 38.16 च्या सरासरीने 10 हजार 151 धावा केल्या आहेत. यामध्ये 25 शतक आणि 51 अर्धशतकांचा समावेश आहे.
विश्वचषक2019 नंतर ख्रिस गेल एकदिवसीय क्रिकेटला करणार अलविदा
दरम्यान, फेब्रुवारी 2019 मध्ये याआधीच ख्रिस गेलने यावर्षी इग्लंडंमध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषकानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे.