राज ठाकरे माझ्या सतत संपर्कात – नारायण राणे

सिंधदुर्ग: स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी ‘नो होल्डस बँरेड’ या आत्मचरित्रात आपला राजकीय प्रवासाचा लेखाजोखा मांडला आहे. या आत्मचरित्रात त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्याबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एका वृत्तवाहिनी बोलताना राणेंनी शिवसेना सोडतांना राज ठाकरे माझ्या सतत संपर्कात होते, असा गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेना, कॉंग्रेस आणि भाजपा असा तिन्ही पक्षांमधला प्रवास आपण लिहिला आहे. तसेच उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, त्यांच्यासोबत फक्त वैचारिक मतभेद आहेत असेही राणे यांनी सांगितले आहे. माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्याने मनोहर जोशींचा माझ्यावर राग होताच. जोशी हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे झाले. वरकरणी मनोहर जोशी पक्षाचे हितचिंतक आहेत असे वाटत असले तरीही त्यांच्यामुळेच शिवसेनेवर आजची स्थिती आहे असेही नारायण राणेंनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.