विश्वचषक2019 नंतर ख्रिस गेल एकदिवसीय क्रिकेटला करणार अलविदा

नवी दिल्ली – वेस्टइंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलने यावर्षी इग्लंडंमध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषकानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. क्रिकेट वेस्टइंडिजने रविवारी याबाबतची माहिती दिली.

क्रिकेट वेस्टइंडिजने दिलेल्या माहितीनुसार एकदिवसीय मालिकेसाठी सराव सुरू करण्यापूर्वी गेल निवृत्तीबाबत घोषणा केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्टइंडिज संघासाठी सर्वात जास्त शतकी खेळी या गेलच्या नावावर आहेत. इतकेच नव्हे तर ब्रायन लारा नंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्टइंडिजकडून सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रमही गेल याच्या नावे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, ख्रिस गेल याचे बऱ्याच कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघात पुनरागमन झाले होते. ख्रिस गेल याचा इंग्लंडविरूध्द होणाऱ्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या स्फोटक खेळीसाठी ख्रिस गेल हा क्रिकेट विश्वात प्रसिध्द आहे. गेल याने 248 एकदिवसीय सामन्यात 9727 धावा केल्या आहेत. यामध्ये 23 शतक आणि 49 अर्धशतकांचा समावेश आहे. ब्रायन लारा यांच्या नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,405 धावा आहेत. ख्रिस गेल याची झिम्बाब्वे विरूध्दची 215 धावांची खेळी ही सर्वोच्चत्तम आहे. गेलने 1999 मध्ये भारताविरूध्दच्या सामन्यातील एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)