World Cup 2023 New Zealand vs Bangladesh Match : विश्वचषकाच्या 11व्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना बांगलादेशशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत नऊ गडी गमावून 245 धावा केल्या असून न्यूझीलंडला विजयासाठी 246 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
Time to chase! Ferguson (3-49), Boult (2-45), Henry (2-58), Santner (1-31) and Phillips (1-13) the wicket takers. Follow play LIVE in NZ with @skysportnz. LIVE scoring | https://t.co/aNkBrDiAuv #CWC23 #BACKTHEBLACKCAPS pic.twitter.com/BSrIwuZWU6
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 13, 2023
बांगलादेशकडून अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमने 75 चेंडूत सर्वाधिक 66 धावा केल्या. अनुभवी खेळाडू महमुदुल्लाहने नाबाद 41 तर कर्णधार शकीब अल हसनने 40 धावांची खेळी केली.
न्यूझीलंडकडून गोलंदाजीत लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याने 10 षटकात 49 धावा दिल्या. याव्यतिरिक्त ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्रीने प्रत्येकी दोन गडी बाद केले तर ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सैंटनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दरम्यान, न्यूझीलंडचे हा सामना जिंकून सलग तिसऱ्या विजयावर लक्ष आहे. त्यांनी इंग्लंड आणि नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवला होता. त्याचबरोबर बांगलादेशने दोनपैकी एक सामना जिंकला आहे आणि एक पराभव पत्करला आहे. बांगलादेशने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. इंग्लंडविरुद्ध त्यांचा पराभव झाला होता.