नवी दिल्ली – महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आजपासून (शुक्रवार) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघ साखळी फेरीत सात संघाविरुद्ध भिडणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध रविवारी होणार आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 स्पर्धेत यंदा भारतीय महिला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय महिला संघाच्या नेतृत्वाची धुरा अनुभवी खेळाडून मिताली राजच्या खांद्यावर असणार आहे.
All-set for the 1st Match of Cricket World Cup? 😃
Who are you supporting then?
Like = New Zealand
Retweet = West Indies#CWC22 pic.twitter.com/E7u4q3IoxQ— Female Cricket #CWC22 (@imfemalecricket) March 3, 2022
करोनामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेली ही स्पर्धा सहा ठिकाणी खेळवली जाणार आहे. या स्पर्धेची सुरूवात सहा विजेतेपदांसह सर्वात यशस्वी ठरलेल्या ऑस्ट्रेलिया आणि गतविजेत्या इंग्लंड यांच्या सामन्याने होणार आहे. इंग्लंडने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना 6 मार्चला खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ सात सामने खेळणार आहे. साखळी फेरीतील भारताचा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्राइस्टचर्च येथे पार पडणार आहे.
विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारताने न्यूझीलंडमध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली आहे. या स्पर्धेत भारताचे पाच खेळाडू संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. यात सलामीवीर स्मृती मानधनाची कामगिरी निर्णायक ठरणार आहे. या स्पर्धेत तिच्याकडून संघाला चांगल्या सुरूवात करून देण्याची अपेक्षा आहे. याआधी 2017 विश्वचषकात तिने उत्तम प्रदर्शन केले होते. मागच्या विश्वचषकात 9 सामन्यांमध्ये तिने 232 धावा केल्या होत्या. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकते.
दुसरीकडे गोलंदाजीची धुरा भारतीय संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामीवर आहे आहे. तिने महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच उपकर्णधार हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्मा यांच्याकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.