पुणे – यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर (पुणे मार्गिका) लोणावळा एक्झिट याठिकाणी गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत शुक्रवारी (दि. 1 सप्टेंबर) दुपारी 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे काम करणार आहे. त्यामुळे पुण्याच्या दिशेकडील वाहतूक पूर्णतः बंद राहील.
यावेळी वाहनधारकांना खंडाळा एक्झिट मार्गे जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरुन वळवण येथील पथकर नाक्यावरुन पुन्हा पुण्याच्या दिशेने द्रुतगती मार्गावरुन जाता येईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले. दरम्यान, वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी या वेळेत प्रवास टाळावा किंवा पर्यायी मार्गाचा वापर असे आवाहन यावेळी करण्यात आले.