दुबई – आयसीसीने महिलांच्या एकदिवसीय सामन्यांची क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे. त्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. स्टार फलंदाज व सलामीवीर स्मृती मानधनाने मात्र, प्रगती केली असून ती आता नवव्या स्थानावर झाली आहे.
न्यूझीलंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महिला विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी सुमार झाली होती. त्यामुळे खेळाडूंच्या क्रमवारीत बदल झाले आहेत. क्रमवारीत आता मितालीचे 686 रेटिंग गुण आहेत. दुसरीकडे मानधनाने क्रमवारीत प्रगती केली आहे.
भारताच्या हरमनप्रीत कौर 14 व्या स्थानावर आहे. विश्वकरंडक विजेत्या ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिलीने क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले असून नतालिया सीव्हरने अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.