नवी दिल्ली – भारताच्या महिला हॉकी संघाने मुमताज खानच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर एफआयएच ज्युनिअर विश्वकरंडक हॉकी स्पर्धेच्या साखळी फेरीत मलेशियाचा 4-0 असा पराभव करत आगेकूच केली.
मलेशियाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या मुमताजने 10, 26 व 59 व्या मिनिटाला गोल केले. तिला साथ देताना स्ट्रायकर संगीता कुमारीने 11 व्या मिनिटाला गोल केला. भारताचा समावेश ड गटात असून आतापर्यंत झालेले तीनही सामने जिंकले आहेत. यापूर्वी भारताने वेल्सचा 5-1 असा तर, जर्मनीचा 2-1 अस पराभव केला होता.