मुंबई :- एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान भारतीय संघाला विजेतेपद मिळवण्याची नामी संधी आहे, असे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी म्हटले आहे. मात्र, त्यासाठी केवळ चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल याचा विचार केला जाऊ नये. संघातील कोणताही खेळाडू त्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. भारतीय संघाची सध्याची खरी गरज आहे ती अष्टपैलू खेळाडूंची. असं त्यांनी म्हटले आहे.
हार्दिक पंड्या हा एकमेव अष्टपैलू संघात आहे. रवींद्र जडेजाही आहेच मात्र, पंड्या फलंदाजीच्या बाबतीत भारतीय सघाला जास्त लाभदायक ठरू शकतो. या स्तरावर संघात किमान तीन अष्टपैलू खेळाडू हवेतच, असेही गावसकर म्हणाले.
दरम्यान, स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. त्याचवेळी टीम इंडिया 8 ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
त्यानंतर 11 ऑक्टोबरला भारत आणि अफगाणिस्तानचे संघ आमनेसामने असतील. यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ 15 ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.