दुबई :- एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने क्रमवारीही जाहीर केली आहे. त्यात फलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या शुभमन गिलने तर वेगवान गोलंदाजांच्या क्रमवारीत महंमद सिराजने अव्वलस्थान प्राप्त केले आहे.
या स्पर्धेत भारताने 8 पैकी 8 सामने जिंकून आयसीसी क्रमवारीत सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये वर्चस्व निर्माण केले आहे.
गिलने पाकिस्तानच्या बाबर आझमला खाली खेचत पहिले स्थान पटकावले आहे. फलंदाजांच्या एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारा गिल सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीनंतरचा चौथाच फलंदाज ठरला आहे.
सिराजने दोन गुणांचा लाभ घेत अव्वल स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत फिरकी गोलंदाज कुलदीप यादव चौथ्या आणि जसप्रीत बुमराह आठव्या स्थानावर आला आहे. महंमद शामीने सात स्थानांची प्रगती करत टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे.
भारत एकदिवसीय, कसोटी आणि टी 20 क्रिकेटमध्ये सांघिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.
No. 1⃣ Batter in the latest ICC Men’s ODI Rankings for Batters 🔝
No. 1⃣ Bowler in the latest ICC Men’s ODI Rankings for Bowlers 🔝
Congratulations to Shubman Gill & Mohd. Siraj 👏 👏#TeamIndia pic.twitter.com/OeQcf9y6Qq
— BCCI (@BCCI) November 8, 2023
कसोटीत गोलंदाजी क्रमवारीत रवीचंद्रन अश्विन अव्वलस्थानी तर कसोटी अष्टपैलू क्रमवारीत रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर आहे. तर टी-20 फलंदाजी क्रमवारीत सूर्यकुमार यादवने अव्वल स्थान कायम राखले आहे.