पुणे – यश मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि युवकांनी सध्याच्या परिस्थितीचे भान ठेवून स्वतःला घडविले पाहिजे, असे मत निवृत्त पोलीस सहाय्यक आयुक्त कमलाकर ताकवले यांनी व्यक्त केले.
केजेएस एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स यांच्या वतीने पुरंदर तालुक्यातील हरगुडे येथे रामकृष्ण वृद्धाश्रम व आधार व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र भेट, स्वच्छ भारत अभियान, कृषी पर्यटन आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. केजेएस एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव यांनी तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक निवृत्त मेजर जनरल समीर कल्ला यांनी उपक्रमाचे कौतुक केले आहे. माध्यमिक विद्यालय यादववाडी येथील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.
कार्यक्रमासाठी ताकवले चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विवेकानंद ताकवले व सचिव विजय ताकवले, हरगुडे गावचे सरपंच भूषण ताकवले, माध्यमिक विद्यालय यादव वाडीचे मुख्याध्यापक दिलीप नेवसे, आधार व्यसनमुक्ती केंद्र संचालक धीरज आग्ने व प्रल्हाद ताकवले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रा.अविनाश ताकवले यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.जय निकंबे यांनी केले तर प्रा.पूर्वा काणे यांनी आभार मानले. प्रा. ऐश्वर्या साने, निलेश कामठे, ओमकार जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.