पंत, ठाकूरसह नवोदित शर्यतीत

आयसीसीने सुरु केला नवा पुरस्कार

दुबई – करोनाचा धोका कमी झाल्यावर सुरु झालेल्या जागतिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत असलेल्या खेळाडूंसाठी आयसीसीने महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू हा नवा पुरस्कार प्रदान करण्याचे जाहीर केले आहे. त्यात ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर, महंमद सिराज, वॉशिंग्टन सुंदर व टी. नटराजन हे भारतीय नवोदीत खेळाडू या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत.

यंदाच्या जानेवारी महिन्यापासून दर महिन्याला आयसीसी एक नवीन पुरस्कार देण्यात येणार आहे. महिन्यातील सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटूचा सन्मान या पुरस्काराअंतर्गत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी चाहत्यांनाही नामांकन मिळणाऱ्या खेळाडूंना मत देता येणार आहेत. जानेवारी महिन्यात झालेल्या विविध क्रिकेट मालिकांमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या संघातील काही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे.

वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, महंमद सिराज, शार्दुल ठाकूर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लेबूशेन, ज्यो रूट यांसारखे खेळाडू या पुरस्कारासाठी शर्यतीत आहेत. दर महिन्याला पुरूष आणि महिला अशा दोन्ही प्रकारात महिन्यातील 3 सर्वोत्तम क्रिकेटपटूंची नामांकने दिली जातील. खेळाडूचा मैदानावरील पराक्रम, वावर तसेच महिन्यात केलेली कामगिरी याचा विचार करून हे तीन खेळाडू नामांकित केली जातील.

एकूण मतदानाच्या टक्केवारीपैकी आयसीसीच्या मतदान समितीकडे 90 टक्के तर, चाहत्यांकडे 10 टक्के मतदानाचे अधिकारी असतील. आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर चाहत्यांना आपले मत नोंदवता येणार आहे. विजेत्या खेळाडूंची नावे दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जाहीर केली जातील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.