दुबई – आयसीसीच्या बैठकीत संलग्न देशांच्या क्रिकेट मंडळांनी सर्व परिस्थिती विषद केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट लवकरच सुरु करण्याबाबत चर्चा झाली असून ऑगस्टपासून सामने सुरु होण्याबाबत अनुकूलता दिसून आली आहे.
करोनाचा धोका पूर्णपणे नियंत्रणात आला किंवा त्याचा प्रसाराचा वेग मंदावला तर आणखी 2 महिन्यांनी क्रिकेट सामने खेळविणे शक्य होणार असल्याचे संकेतही आयसीसीने दिले आहेत. पुढील एक महिन्यात करोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून त्यावेळी पुन्हा एकदा सलंग्न देशांच्या क्रिकेट मंडळांशी चर्चा करण्यात येणार असून त्यानंतरच अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.
आगामी काळात विविध देशांच्या मालिका रडारवर आहेत. त्याचबरोबर सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. त्याचवेळी आशिया चषक स्पर्धा व आयसीसीच्या पात्रता स्पर्धा देखील वेळापत्रकात जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, करोनाचा धोका संपुष्टात आला तरच या स्पर्धा होतील अन्यथा त्यावेळी काय परिस्थिती आहे ते पाहून निर्णय घेतला जाईल असेही सांगण्यात येत आहे.