सुशांतसिंह राजपूत याचा “दिल बेचारा’ या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटातून अभिनेत्री संजना सांघी डेब्यू करत आहे. संजनाने यापूर्वीही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. पण मुख्य अभिनेत्री म्हणून तिचा हा पहिला चित्रपट आहे.
या चित्रपटाचे पहिले गाणेही रिलीज झाले असून ते ऐकल्यानंतर चाहते खूप भावुक झाले आहेत. या चित्रपटात ए. आर. रहमानच्या संगीताचे कौतुक करणारी एक मोठी पोस्ट संजनाने पोस्ट केली आहे.
तिने इन्स्टाग्रामवर लिहिले की, वयाच्या 13 व्या वर्षी माझ्या शाळेत मला परफॉर्मन्स करताना पाहिल्यानंतर मुकेशने मला ऑडिशन देण्यास सांगितले. यानंतर मला “रॉकस्टार’मध्ये मॅंडीची भूमिका मिळाली. “रॉकस्टार’दरम्यान बऱ्याच जादुई गोष्टी माझ्याबरोबर घडल्या. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ए.आर. रहमान यांचे संगीत.
संजनाने पोस्टमध्ये लिहिले की, जर आपण मला सांगितले की ते (मुकेश छाबरा) मला “दिल बाचारा’ या चित्रपटातून डेब्यू करण्याची संधी देणार आहे जी माझ्या आवडत्या “द फॉल्ट इन अवर स्टार्स’ कादंबरीवर आधारित आहे. तसेच याला रहमान यांचे संगीत आणि मुकेश हे दिग्दर्शक आहेत. तर मी माझ्या स्वप्नातही याचा विचार करू शकत नाही. धन्यवाद सर, तुमच्या आशीर्वादासाठी.