मुंबई – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी रोज नवनवे ऑडिओ क्लिप्स आणि फोटो समोर येत असल्याने वनमंत्री संजय राठोड यांच्यासमोरील अडचणी वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना आधी दीड तास ताटकळत ठेवलं आणि नंतर दोन मिनिटांची भेट दिली आणि बहुधा कानात सांगितलं असावं. मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक बुधवारी पार पडली. यावेळी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वनमंत्री संजय राठोडही उपस्थित होते. परंतु, कॅबिनेटच्या बैठकीत संजय राठोड प्रकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती मिळाली. परंतु, कॅबिनेट बैठकीनंतर वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. यानंतर वर्षा बंगल्यावर सर्व शिवसेना नेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यामुळे आता संजय राठोड यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.