स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव दिल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम ठरलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिल्यानंतर विरोधकांकडून भाजपाला आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं जात असल्याचे दिसत आहे. मात्र शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या प्रकरणी सावध भूमिका घेतल्याचं चित्र आहे.

संजय राऊत म्हणाले,’ मोटेरा स्टेडियमचा निर्णय हा त्यांच्या राज्य सरकारचा निर्णय असेल किंवा क्रिकेट बोर्डाचा असेल. त्याच्यामध्ये आम्ही काय भूमिका घेऊ शकतो. स्टेडियमला पंतप्रधानांचं नाव दिलं आहे ज्यांना नको असेल त्यांनी स्पष्ट पणे बोलावं’ अशी प्रतिक्रिया त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांसोबत बोलतांना दिली आहे.

दरम्यान, बुधवारी १ लाख ३२ हजार प्रेक्षकसंख्येची क्षमता असणाऱ्या भव्य मोटेरा स्टेडियमचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं. या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.