पाचगणी: जावळी तालुक्यांतील राजकीय वातावरण जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे गरम झाले आहे. जावळीचे आमदार शशिकांत शिंदे यांना बिनविरोध न करता निवडणुकीला सामोरे जावे लागणार का ? याबाबत संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच शशिकांत शिंदे यांनी “संघर्षातुन पुढे आलो आहे , लढणं माझ काम “ असे वक्तव्य केल्यामुळे जावळीची जिल्हा बँकेची निवडणुक रंगतदार होणार असल्याचे म्हटले आहे.
शशिकांत शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुका पक्षविरहीत लढली जाते. अजुन कोणतीही बैठक वरीष्ठ पातळीवर झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन पक्ष आदेश देईल त्यावेळेस मला भुमीका घ्यावीच लागेल. जावळी तालुक्यांत पक्षाच्या माध्यमातुन काम करण्यास मी सदैव तयार आहे अशी ग्वाही शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिली.
जावळी तालुक्यात विकास सोसायटीच्या माध्यमातुन आपल्या समोर संघर्ष उभारला जातो आहे का असे विचारले असता, मी संघषातुन पुढे आलो आहे . लढन माझ काम असल्याच यावेळी आवर्जुन आ शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, शशिकांत शिंदे यांची जावलीतील दर्पोक्ती लढायची असल्याने जिल्हा बँकेत जर बिनविरोध झाली नाही तर लढायची देखील तयारी शिंदे यांनी दाखवल्याने जावलीतील शिंदे गट चार्ज झाला असल्याचे आता लपुन राहीले नाही. शशिकांत शिंदे जिल्हा बँकेबाबत काय भुमीका घेणार याबाबत दिल्लीपासून जावलीपर्यंत चर्चा सुरु आहे.