बॉलिवूडमध्ये अलिकडे कोणता ना कोणता स्टारकिड पदार्पण करत आहे. ज्यात सुहाना खान, आर्यन खान, अनन्या पांडे यांसारखे स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. यात आणखीन एकाची भर पडली असून अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी सुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार आहे. दिग्दर्शक साजिद नाडियावाला अहानला “आरएक्स 100’या तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या रिमेकमध्ये लॉंच करणार आहेत.
या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उशीर होत असल्याने अभिनेता सुनील शेट्टी नाराज असल्याचे समजते. या चित्रपटाचे चित्रणीकरण या वर्षी जूनमध्ये सुरू होणार होते. परंतु ऑगस्ट महिना आला तरी चित्रणीकरण अद्यापही सुरू झाले नाही आणि यामुळे सुनील शेट्टी स्वत: हा चित्रपटाची कमान हाती घेणार असल्याची चर्चा आहे.
आहानने या चित्रपटासाठी मागील एक वर्षापासून खूप मेहनत घेतली असून ऍक्शन सीन्ससाठी ट्रेनिंग सुद्धा घेतली आहे. चित्रणीकरणासाठी उशीर होत असल्याने अहानही नाराज असल्याचे बोलले जात आहे. सुनील शेट्टी आपल्या अगामी साउथ इंडियन चित्रपटाच्या चित्रणीकरणामध्ये बीझी आहे. दरम्यान सुनील शेट्टी वेळ काढून “आरएक्स 100′ या चित्रपटाच्या चित्रणीकरणाकडे लक्ष देणार आहे.